कशी असते प्रगती आणि विकास?


पूर्वी लोक शिकलेले नव्हते....

आता प्रगती झाली....

आता विकास झाला आहे....

किती झाला विकास कशी झाली प्रगती...

वाचा...👇

1.पुर्वी लग्नात माणसं एका जागेवर बसून जेवायचे आणि वाढणारे फिरून वाढायचे आता वाढणारे एका जागेवर असतात आणि जेवणारे फिरतात..

2.
पुवीॅ   माणूस   जेवण   घरी  
करीत   होता.  आणि    शौचालय   बाहेर    होत.
आता   जेवण   बाहेर   करतो
आणि   शौचालय   घरात  आहे.

3.
पुर्वी लोक   घराच्या   दारावर   एक   माणूस   ठेवायचे.
कारण   कुणी   कुत्रं   घरात   घुसू   नये.
आजकाल   घराच्या   दारावर        कुत्रं   उभं   ठेवतात.   कारण
कुणी   माणूस   घरात    येऊ  नये.

4.
पुवीॅ   लग्नात   घरच्या    स्रिया   जेवण   बनवायच्या.
आणि   नाचणार्‍या   बाहेरून यायच्या. 
आता   जेवण   बनवणाऱ्या    बाहेरून   येतात.
आणि   घरातल्या   स्रिया   नाचतात.

5.
पुवीॅ   माणूस   सायकल   चालवायचा   
तो    गरीब   समजला   जायचा.
आता    माणूस   कारने  जिममध्ये  जातो 
अन् सायकल चालवतो !

6.
पुर्वी वायरीच्या फोनने
लांबची माणसे ही जोडली जायची.
आता बिनवायरीच्या मोबाईलने
जवळच्या नात्याचे दोर ही कच्चे केलेत!

7.
पुर्वी माणुस चुलीवर स्वैपाक करायचा
मग LPG वर स्वैपाक करायला लागला.
आता चुलीवरच जेवण खायला
ढाबा शोधायला जातो !

8. पुर्वी माणसं कशी शहाणी होती.
आता माणसं येडी अन्
हातातले फोन स्मार्ट झालेत .

9. पूर्वी रस्ते मातीचे अन्
माणसे साधी होती ...
आत्ता रस्ते डांबरी अन्
माणसे डांबरट झालेत ...


10. किंमत फक्त गावरान वस्तूंना आहे.बाजारात प्रत्येक झान गावरान वस्तू शोधतो. पण कोणाला गावरान म्हटलं की राग येतो...

😀😂पटलं बुवा आपल्याला ..


तरी लोक म्हणतात...देव बिव नसतो...



Post a Comment

0 Comments