तुमच्या राशीनुसार आहार घ्या, सशक्त व्हा!

सण साजरे कराल तर स्वस्थ राहाल हा लेख मागच्या बुधवारी म्हणजेच दिवाळीच्या दिवशी सामनामध्ये प्रसिद्ध झाला. वाचकांना तो लेख प्रचंड आवडला. आपले सणवार हे आपल्या फायद्यासाठीच साजरे करायचे असतात आणि तोच उद्देश आहे. आपली सर्व शास्त्र आपल्या शरीर शास्त्रानुसार बनवली गेलेली आहेत असं मला वाटतं. पंचमहाभूतांनी व्याप्त असं आपलं ब्रम्हांड आणि तसंच आपलं शरीर. ही शरीर रचना समजायची एक पद्धत म्हणजे – ज्योतिषशास्त्र. आज थोडक्यात मी ह्या पद्धतीचा आढावा देणार आहे आणि आपण काय काळजी घेतली म्हणजे शरीर सुदृढ राहील ह्याच्या काही टिप्स देणार आहे.

पूर्वीच्या काळी वैद्य जेव्हा रुग्णाला औषधे देत असत तेंव्हा रुग्णाची राशी आणि नक्षत्र विचारात असत. ह्या राशीवरून आणि नक्षत्रावरून रुग्णाची नैसर्गिक शरीर रचना कशी आहे ते क्षणात लक्षात यायचे आणि त्याप्रमाणे औषधोपचार केला जायचा. जर अग्नितत्वाची प्रकृती असेल तर त्याप्रमाणे औषधं दिली जायची. नाहीतर हल्ली सर्व रोगांना एकाच पद्धतीचे औषध दिले जाते आणि अग्नितत्वाच्या रुग्णांना ह्या औषधांनी उष्णता वाढते. (तोंड येतं,पित्त वाढतं इ. ) मग ह्या उष्णतेवर पून्हा दुसरे औषध घ्यावे लागते. त्यापेक्षा आधीच जर रुग्णाची प्रकृती समजून घेतली तर त्याप्रमाणे उपचार करता येतील आणि रुग्णाला त्रास होणार नाही. बघा विचार करून.

आपल्या सर्व बारा राशी चार तत्वांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. ही चार तत्व म्हणजे -अग्नितत्व, पृथ्वीतत्व, वायुतत्व आणि जलतत्व.
अग्नितत्व राशी – मेष,सिंह आणि धनु

पृथ्वीतत्व राशी – वृषभ, कन्या आणि मकर

वायुतत्व राशी – मिथुन,तूळ आणि कुंभ

जलतत्व राशी – कर्क,वृश्चिक आणि मीन

अग्नितत्व -: अग्नितत्वचा संबंध आपल्या शरीरातील उष्णतेशी आहे,आपल्या पोटातील अग्निशी आहे. अग्नितत्वाची लग्नरास असेल तर अशा व्यक्तिंमध्ये शारीरिक उष्णता अधिक आढळून येते. त्यांचे हाताचे तळवे नेहेमी गरम असतात. ह्या व्यक्तिंना घामही खूप येतो. ह्यांची उंची आणि शरीराची रुंदी व्यवस्थित असते. बांधेसूद असतात. मेष,सिंह आणि धनु ह्या राशी मुळातच दुसऱ्यांवर अधिकार गाजवणाऱ्या आहेत. ह्यांच्यावर कोणी अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तो सहन होत नाही आणि म्हणूनच ह्या राशीच्या व्यक्तिंना नोकरीत जास्त त्रास होतो. ह्यांचा कल व्यवसाय करण्याकडे जास्त असतो. ह्या व्यक्तिंना रागही खूप येतो.

अग्नितत्वाचा संबंध पोटाशी म्हणजेच पचनक्रियेशी आहे. हे तत्व बिघडले तर पचनक्रिया बिघडू शकते. आपल्या शरीरातील Blood Circulation चा संबंध अग्नितत्वाशी आहे. हे Circulation थांबले म्हणजे शरीर थंड पडते परिणामी मृत्यूच. शरीरातील उष्णता फार वाढू देऊ नये किंवा ती कमी होता काम नये. उष्णता वाढली म्हणजे पित्त खवळणार. म्हणून ह्या लोकांनी पाण्याचे प्रमाण वाढवावे. प्रमाण वाढवायचे म्हणजे काय करायचं ? तर पाणी युक्त आहार घायचा.

काकडी,कलिंगड,टरबूज,टोमॅटो, हिरव्या भाज्या ह्याचा आहारात अवलंब करावा. सब्जाचं पाणी,वाळ्याचे पाणी पिणे. दुर्वांचा -बेलाच्या पानांचा रस पिणे. (अर्थात हे सर्व तुमच्या डॉक्टरांना विचारून )

पिवळ्या गोष्टी म्हणजेच – पपई,भोपळा,तिखट चमचमीत पदार्थ ह्याचे प्रमाण कमी असावे. पांढऱ्या गोष्टींचा समावेश आहारात असावा. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे.

सकाळी आणि संध्याकाळी जमल्यास अनवाणी पायांनी बागेत हिरव्या गवतावरून चालावे.

पृथ्वीतत्व – : पृथ्वीतत्व म्हणजे शारीरिक ताकद साठवणे. ह्या राशीच्या व्यक्ति फार आजरी पडत नाहीत परंतु ह्यांचे आजार दीर्घकाळ चालणारे असतात. पृथ्वीतत्वाच्या अंमलाखाली खांदे -मान,आतडी आणि गुडघे येतात. ह्या व्यक्तिंचा बांधा फार सडपातळ किंवा बांधेसूद नसतो. तब्येत सांभाळून असतात. ह्यांना धर्माचे अवडंबर माजवलेले आवडत नाही. देवळात जाणे, धार्मिक विधी ह्या सगळ्याला त्यांचा विरोध असतो. जीवनाबद्दल “Practical” विचार असतात. अत्यंत मुडी असतात. वृषभ,कन्या आणि मकर ह्या राशी पृथ्वीतत्वाखाली येतात. ह्या राशींपैकी मकर ही रास फार “Social” नसते. आपण भले आणि आपले काम भले अशी वृत्ती असते. वृषभेला स्वतःची स्तुती करून घ्यायला फार आवडते तर कन्येला व्यवसायात फार रस असतो. ह्या तिन्ही राशींचे एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यांना पैसे कसे कामवावेत ह्याचा नैसर्गिक sense असतो. परंतु ह्या व्यक्ति लवकर सगळ्यांमध्ये मिसळू शकत नाहीत. हे फार “expressive” नसतात.

ह्यांना होणार त्रास मुख्यत्वे आतड्यांचा असतो. त्यांनी आपले Diet व्यवस्थित पाळले आणि रोज थोडे चालणे ठेवले तर प्रकृती ठणठणीत राहील. ह्या व्यक्तिंना वाताचा त्रास असतो. म्हणून थंड पदार्थ, शिळे पदार्थ घेऊ नयेत. आता शिजवले आता जेवलो हा कानमंत्र सुट्टीच्या दिवशी तरी पाळावा. कोमट पाणी थंडीच्या दिवसात घ्यावे. पचनक्रिया सक्रिय राहील असा आहार घ्यावा. चालणे जरूर असावे.

वायुतत्व – : वायुततत्वाच्या राशी म्हणजे मिथुन,तुळ आणि कुंभ. ह्या तत्वाखाली येणारे शरीराचे अवयव म्हणजे – फुफ्फुसे, पोटाच्या नाभीखालील भाग,मूत्रपिंड आणि पोटऱ्या/पाय. ह्या व्यक्ति स्थूल असतात. आहार इतका नसतो परंतु वजन जास्त असते. वजन जास्त असले तरी बलवान नसतात. ह्या राशींची बुद्धिमत्ता इतर राशीपेक्षा उच्च कोटीची असते. परंतु बुद्धीचा चांगला वापर झाल्यास अशा व्यक्ति आयुष्यात पुढे येतात. आयुष्यात “success” जर मिळाला नाही तर मात्र मानसिक आजाराशी ह्यांना झगडावे लागते.
ह्यांचीं प्रकृती “sensitive” असते म्हणजे ह्यांना वातावरणातील बदल लगेच समजून येतो. ह्यांना ऍलर्जी लगेच होते. वातावरणात जरा बदल झाला की खोकला होणे,सर्दी होणे,त्वचेवर पुरळ उठणे ह्या गोष्टींचं त्रास होतो. नुसता वातावरणातील बदलामुळेच ह्यांना त्रास होतो असे नाही तर ह्यांच्यासाठी काही खाण्याचे पदार्थही ऍलर्जिक असतात. अशा पदार्थांचा अवलंब टाळलेला बरा . ह्यांना सांधे दुखीचाही त्रास असतो.

ह्यांनी आपल्या आहारात खालीलप्रमाणे बदल करावेत – एकाचवेळी जेवून घेऊ नये. थोड्या थोड्या वेळेच्या अंतराने खात रहावे. म्हणजे अन्न व्यवस्थित पचेल. पोटऱ्यांना “Cramps” येत असतात. विशेषतः थंडीत झोपण्याआधी पायांना राईच्या तेलाने मालिश करावे आणि कोमट पाण्याने शेक द्यावा म्हणजे “Cramps” येणार नाहीत. योगासने शिकून घ्यावीत. श्वसनसंस्थेशी निगडीत आसने करावीत. ओंकार साधना करावी. त्याने नक्की फरक दिसून येईल.

जलतत्व – : जलतत्व नावातच जल म्हणजे पाणी आहे. ह्या व्यक्ति अत्यंत भावुक असतात. सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या व्यक्ति म्हणजे कर्क,वृश्चिक आणि मीन. त्यांच्या ह्या स्वभावामुळे घरातील इतर व्यक्ति ह्यांच्यावर नाराज असतात. हे स्थुल प्रकारात मोडतात आणि बांधेसूद म्हणता येईल अशी शरीररचना अजिबात नसते. सतत काही ना काही विचार सुरूच असतात. विचार करता करता डोळ्यातून अश्रू ढाळणे हे चालूच असते. त्यामुळेच ह्यांना सर्दी खफाचा त्रास असतो. लहानपणी लक्ष न दिसल्यास निमोनियाचा त्रास होतो. अन्न पचत नाही आणि आतड्यांचा त्रास होत असतो. जितक्या व्यक्तिंना “Piles” किंवा आतड्यांचा त्रास झालेला आहे त्यांनी आपल्या कुंडलीतील वृश्चिक रास तपासावी. त्या राशीत चंद्र किंवा मंगळ असणारच. पायाचे तळवे सतत दुखत असतात. दुसऱ्यांसाठी सतत पळापळ असते मग पायाचे तळवे दुखणे आलेच की !!!

ह्यांना शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास जास्त असतो. मानसिक त्रास म्हणजे सततच्या विचारांनी होणारी डोकेदुखी, धावपळीने स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न देता येणे. मग ह्या धावपळीचा परिणाम म्हणजे ह्या व्यक्ति दीर्घकाळासाठी आजारी असतात. त्यांच्या ह्या आजारात सर्वांनी यावे त्यांना भेटावे ही माफक इच्छा त्यांची असते. परंतु सर्वांना इतका वेळ मिळेलच ही शाश्वती नसते. मग ह्यांचे मन अजून खट्ट होते की – मी सर्वांसाठी धावाधाव करते परंतु माझ्यासाठी कोणाकडे वेळ नाही. काय पटतंय का ?
ह्यांनी आहारकडे व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे. जेवतांना मोबाईल,टी.व्ही. बंद असावा. हिंदी -मराठी सिरिअल्स बघूच नये. दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवून कार्य करू नये.

आहारात थंड गोष्टी टाळलेल्याच बऱ्या. थंड पाणी,कोल्ड ड्रिंक्स अजिबात घेऊ नयेत. भात आणि भाताचे प्रकार टाळावेत. पिवळ्या वस्तूंचा आहारात समावेश असावा जसे की – पपई,भोपळा,गहू,उडीद,मूग,संत्र,मोसंबी.
ह्यांनी meditation शिकून घ्यावे. रोज संध्याकाळी meditation केल्यास प्रकृतीत सुधारणा दिसून येईल.

वर दिलेली माहिती ही फक्त राशीप्रमाणे आहे. राशी म्हणजे कुंडलीचा १०% भाग. संपूर्ण कुंडलीचा अभ्यास करून व्यक्तिला डाएट तर देता येईलच परंतु त्याचे “Counselling” ही करता येईल. वर दिलेला आहार हा तुमच्या डॉक्टरांना विचारून अवलंबणे. प्रत्येक व्यक्ति भिन्न आहे त्यामुळे त्याचा आहार वेगळा असतो. वर ढोबळमानाने मी आढावा दिला आहे ह्याची नोंद घेणे. 

Post a Comment

0 Comments