*झोपण्याचे नियम*
----------------------------
▪ झोपतांना नेहमी आपले डोके पूर्वेला व पाय पश्चिमेला असावेत. एखाद्या वेळी दक्षिणेला डोके चालेल ; पण पश्चिमेला व उत्तरेला बिलकुल नको. कारण आपल्या शरीराची चुंबकीय दिशा पायाची बाजू दक्षिण व डोक्याची बाजू उत्तर आहे. जर आपण उत्तरेला डोके करून झोपलो तर उत्तर-उत्तर चुंबकीय तत्व एकत्र येतात. दोन सजातीय चुंबकीय तत्व एकत्र आल्याने त्यामध्ये परस्पर प्रतिकार केला जातो. त्यामुळे आपल्या डोक्यावर रात्रभर दाब राहतो. त्यामुळे आपले बी.पी. कमी-जास्त होते. त्याने आपल्या शरीरात खूप खराबी येते व माणसाला लवकर मृत्यूला सामोरे जावे लागते. पूर्व दिशेला मात्र पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल सर्वात कमी असते.
रात्रीची झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. झोपेची वेळ वयानुसार असते. पण कमीत कमी ६ तास तरी झोपावेच. १ वर्षाच्या बाळाला १८ तासापेक्षा जास्त , १ ते ४ वयात १४ तास , ४ ते ५ वयात १२ तास , ५ ते १५ वयात १० तास , १५ ते २५ वयात ९ तास , २५ वर्षानंतर ६ ते ७ तास , कष्टकऱ्यासाठी ७ ते ८ तास असे झोपेचे प्रमाण आहे. झोप व्यवस्थीत व शांत न झाल्याने ५० रोग होतात.
▪ झोपण्या अगोदर लघवीला जाऊन यावे म्हणजे रात्रीचे उठावे लागत नाही.
▪ झोपतांना प्रथम डाव्या कुशीवर २ मिनिटे झोपावे. नंतर उजव्या कुशीवर २ मिनिटे झोपावे. नंतर तोंड वर करून म्हणजे पाठीवर झोपावे. पाठीवर झोपल्यावर आपल्या हाताचे तळवे पोटाच्या व छातीच्या मध्यभागी ठेवावे.
▪ पहाटे लवकर उठावे, व्यायाम करावा तसेच शरीर श्रम करावे.
▪ चंद्रनाडी सक्रिय असल्यास झोप शांत लागते.
म्हणून झोप लागत नसल्यास उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेत रहावे.
▪ झोपेतून उठतांना उजव्या कुशीवर व्हावे व नंतर उजव्या कुशीवरूनच उठावे.
▪ लहान मुले जशी झोपतात , ती पद्धतसुद्धा झोपायला चांगली. एका कुशीवर झोपून एक पाय लांब व एक दुमडलेला अशी अवस्था चांगली.
▪ मासिक पाळीच्या वेळेस स्त्रीयांनी पालथे ( पोटावर ) झोपावे. मकरासनात झोपावे. मासिक पाळीच्या वेळेस गर्भाशय फुलत असते ते आरोग्यास योग्य नसते.
▪ पुरुषांनी मात्र पालथे झोपू नये. हार्निया, अपेनडिक्ससारखे आजार होतात.
▪ झोपतांना श्वास पोटात घ्यावा. काम करताना छातीत श्वास घ्यावा.
▪ झोपतांना हात , पाय , तोंड स्वच्छ धुऊन झोपावे.
▪ झोपतांना पायमोजे व घट्ट कपडे घालू नयेत.
0 Comments